२०२४ मधे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यून सुक येवोल यांनी लादलेला मार्शल लॉ चुकीचा असून ही देशाविरोधात बंडखोरी असल्याचा निर्णय आज दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने दिला. दक्षिण कोरियाचे माजी प्रधानमंत्री हान डुक सू यांनी यून यांना त्या काळात मदत केल्याचा ठपका ठेवत त्यांना २३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयामुळे यून आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात कारवाईचा मार्ग खुला झाला आहे. हान डुक सू यांना यून सुक येवोल यांनी नियुक्त केलं होतं. मार्शल लॉ लागू असलेल्या काळात ते एक जबाबदार नेते होते. याच प्रकरणात यून यांच्यावर महाभियोग चालवला गेला आणि त्यांना पदावरून हटवलं गेलं. यून यांच्या खटल्याप्रकरणी न्यायालयात १९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
Site Admin | January 21, 2026 7:18 PM
मार्शल लॉ चुकीचा असून ही देशाविरोधात बंडखोरी असल्याचा दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाचा निर्णय