कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आज सुरु झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर १ गडी गमावून ३७ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. एडन मार्क्रमच्या ३१ धावा ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं अवघ्या २७ धावा देत ५ बळी घेतले. महमंद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला.
फलंदाजीसाठी आल्यावर भारताचा पहिला गडी लवकर बाद झाला. संघाची धावसंख्या १८ असताना यशस्वी जैस्वाल वैयक्तिक १२ धावांवर बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा के. एल. राहुल १३, तर वॉशिग्टन सुंदर ६ धावांवर खेळत होता.