दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार

दक्षिण आफ्रिकेत काल वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार झालेत. लिम्पोपो भागात एन १ महामार्गावर सात गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर पाच जखमी झालेत. तर केप प्रांतात ट्रक आणि प्रवासी टॅक्सी यांच्यातच धडक होऊन झालेल्या  अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला.