सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुपुत्रांनी कधीही आपली तत्वं आणि निती यांच्याशी तडजोड केली नाही, याचं स्मरण करणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्री समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाले. जानेवारी १०२६ला सोमनाथवर पहिला हल्ला झाला. वारंवार हल्ले होऊनही भक्तांच्या श्रद्धेच्या जोरावर सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी होत राहिली, असं ते म्हणाले.