‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

महाराष्ट्रानं ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणनं एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली असून गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे. राज्यात साडेदहा लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.