सोलापूर-मुंबई या नव्या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. सोलापूर-मुंबई विमान सेवेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारला जाईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पोलीस स्थानकांच्या इमारतीचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं.
Site Admin | October 15, 2025 7:06 PM | Solapur-Mumbai flight
सोलापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात