शिक्षक पात्रता परीक्षा-टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या आणि इतर मागण्यांसाठी, राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हा परिषद, आणि खासगी शाळांमधल्या २५ पेक्षा जास्त संघटनांचे हजारो शिक्षक, मोर्चात सामील झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, शिक्षणसेवक पद रद्द करावं, शिक्षकांची ऑनलाईन कामं बंद करावी या मागण्याही संघटनेनं केल्या आहेत.
Site Admin | November 9, 2025 7:14 PM | Solapur
राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा