सोलापूर जिल्ह्यातल्या पुरग्रस्त 82 गावात आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक मोहीम, जिल्हा परिषद यंत्रणेनं हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही माहिती दिली आहे.
पहिल्या टप्यात 53 गावात ही मोहिम राबवण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचही जंगम यांनी सांगितलं आहे. ग्राम स्तरावरील सर्व यंत्रणांनी या आरोग्य मोहिमेत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देशही जंगम यांनी दिले आहेत.