डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 19, 2025 10:21 AM | Solapur

printer

सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

सोलापुरमधल्या अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला काल शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलानं जवळपास पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.