महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या स्मृती मंधानानं अग्रस्थान मिळवलं आहे. या मानांकनात तिची गुणसंख्या ८२८ आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशले गार्डनरपेक्षा ती शंभराहुन अधिक गुणांनी पुढं आहे. तिची सलामीची जोडीदार प्रतिका रावल ५६४ गुणांसह २७ व्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ७४७ गुणांसह अग्रस्थानी आहे.