स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज नवी मुंबई महानगरपालिकेला ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आलं. नागरी प्रशासनातला डिजीटल माध्यमांचा प्रभावी वापर, सार्वजनिक सेवा वितरणाच्या कार्यक्षमतेतली वाढ, कामकाजातली पारदर्शकता आणि नागरिकांना झालेला प्रत्यक्ष लाभ अशा विविध उपक्रमांसाठी हा पुरस्कार मिळाल्याची माहिती महापालिकेनं दिली.
Site Admin | February 15, 2025 8:35 PM
नवी मुंबई महानगरपालिकेला स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार
