मुंबईत माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. गेल्या ४० वर्षांपासून इथले लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत, त्यांचा खडतर प्रवास आज संपला असून, या १७ हजार कुटुंबांचं घरांचं स्वप्न महायुती सरकार पूर्णत्वाला नेईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. इथं कोणताही खाजगी बिल्डर नाही, एमएमआरडीएच हा प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे दर्जेदार घरं वेळेत मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या समूह पुनर्विकास योजनेत माता रमाबाई आंबेडकरांचं स्मारक उभारण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.
Site Admin | October 14, 2025 7:09 PM | Slum Redevelopment Project
माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन
