डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 3, 2025 9:43 AM | SLBC Tunnel

printer

SLBC बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे नेमके स्थान अज्ञात, बचावकार्य तीव्र

श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा प्रकल्पाच्या अर्धवट कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या आठ जणांचे नेमके स्थान अद्याप समजून शकलेलं नाही आणि सरकार बचाव कार्याला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. असं तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काल नागरकुरनूल जिल्ह्यातील अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. सरकारनं बचाव कार्याचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना बचाव कर्मचाऱ्यांना धोका टाळण्यासाठी आवश्यक असल्यास बोगद्यात रोबोट वापरण्याची सूचना केली आहे.

 

सरकार या समस्येचे निराकरण करण्यास कटिबद्ध आहे आणि अपघातामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत करण्यास देखील तयार आहे. खराब झालेले कन्व्हेयर बेल्ट दुरुस्त झाल्यानंतर आणि आजपासून बचावकार्य पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्याच्या 22 तारखेपासून एसएलबीसी बोगद्याच्या कोसळलेल्या छताखाली दोन अभियंत्यांसह आठ जण अडकले आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बचाव कार्य युध्दपातळीवर सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.