November 27, 2025 1:18 PM | Skyroot Aerospace

printer

‘स्कायरूट’ या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारने अनेक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूदार याकडे आकर्षित होत आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं, त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं करण्यात आल्यामुळे स्टार्टअप आणि उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेत काम करणं सुलभ झालं, येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार असून देशातल्या युवावर्गाला रोजगाराच्या संधी कैकपटीने वाढणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 

 

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राच्या भवितव्याला ३०० पेक्षा जास्त स्टार्टअप्स आकार देत आहेत, स्कायरूट इन्फिनीटी कॅम्पस हे देशाच्या नवा विचार, नवोन्मेष आणि युवा शक्तीचं प्रतीक आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

 

इस्रोने भारताच्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं असून विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्यं यांच्या जोरावर भारतानं जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.