डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं आयोजन

कौशल्य विकास विभागानं मुंबईत आयोजित केलेल्या  ‘क्षमता विकास आणि जनजगृती’ कार्यशाळेचं केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज दूरस्थ पद्धतीनं उदघाटन केलं. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे, असं मत लोढा यांनी यावेळी व्यक्त केलं. कौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या  योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सुसंवाद आणि समन्वय असणं ही काळाची गरज आहे, असंही ते म्हणाले. या कार्यशाळेत  ६ राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.