हिंदुस्तान एअरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी आता एसजे -100 या प्रवासी विमानांचं उत्पादन करणार आहे. त्याकरता रशियातल्या सरकारी – खासगी भागीदारीतल्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर हालने समझोता करार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कराराचं स्वागत केलं असून आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचं पाऊल असं त्याचं वर्णन केलं आहे. एसजे -100 हे पहिलं स्वदेशनिर्मित प्रवासी विमान असेल असं त्यांनी सांगितलं आहे. या करारामुळे विमान उत्पादन क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला आहे.
Site Admin | October 28, 2025 8:05 PM | HAL | SJ-100 Civil Aircraft
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनी SJ-100 प्रवासी विमानांचं उत्पादन करणार