October 27, 2025 7:09 PM

printer

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचं आठवं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात १२४ देश सहभागी होत असून जगभरातील ४० हून अधिक मंत्री उपस्थित राहतील. जागतिक समुदायाने उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे तसंच अक्षयऊर्जा वाढीसाठी जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेअंतर्गत देशातील २० लाखांहून अधिक कुटुंबांनी सौर ऊर्जेचा लाभ घेतला आहे.