डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून सुरू

६वी आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्र काँग्रेस आजपासून नवी दिल्ली इथं सुरू झाली. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात चर्चासत्रं, व्याख्यान, युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी परिषद तसंच प्रदर्शनाचा समावेश आहे. या कार्यक्रमात जगभरातून प्रतिनिधींसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, आयसीएआरचे उपमहासंचालक, उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे तज्ज्ञ आदी एक हजाराहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ‘स्मार्ट कृषी-अन्न प्रणाली आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषीशास्त्राची पुनर्कल्पना’ अशी या परिषदेची संकल्पना आहे.