विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.