January 7, 2026 9:43 AM | sir | Uttar Pradesh

printer

SIR अंतर्गत उत्तर प्रदेशसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसाठी प्रारूप मतदार यादी काल लखनौमध्ये प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीमध्ये 12 कोटी 55 लाख 56 हजार पेक्षा अधिक मतदारांची नावे आहेत. विद्यमान मतदार यादीतील 81 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी आपले अर्ज भरून नवीन प्रारूप मतदार यादीसाठी नावं नोंदवली आहेत.उत्तर प्रदेशचे राज्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी माध्यमांना ही माहिती दिली विद्यमान मतदार यादीमध्ये एकंदर 15 कोटी 44 लाख 30 हजार 92 मतदार होते. या

 

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन प्रारूप मतदार यादीत एकूण 2 कोटी 89 लाख मतदारांची नावे न आढळल्यानं एकंदर 19 टक्के नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष पडताळणी मोहिमेदरम्यान 46 लाख 23 हजार मतदार, म्हणजेच विद्यमान मतदार यादीच्या

 

एकंदर 3 टक्के मतदार मृत आढळले. यासंदर्भातील दावे आणि आक्षेप स्वीकारण्याचा कालावधी 6 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत निश्चित करण्यात आला असून 6 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत, दावे आणि आक्षेपांवर निर्णय घेतला जाईल. अशी माहितीही रिनवा यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या मतदार यादीचे अंतिम प्रकाशन 6 मार्च रोजी केले जाईल. त्यानंतर, नागरिकांना दावे आणि आक्षेप सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळेल.