September 19, 2025 8:28 PM | Singer Zubeen Garg

printer

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं निधन

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं सिंगापूर मध्ये स्कूबा ड्रायव्हिंग अपघातात निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. गर्ग हे सिंगापूर इथे नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना त्यांचा अपघात झाला. क्रिश ३, गँगस्टर, नमस्ते लंडन यासारख्या चित्रपटात त्यांनी गाणी गायली होती. याशिवाय संगीतकार, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता त्यांनी काम केलं होतं. आसामी, हिंदी, बंगाली आणि इतर अनेक भारतीय भाषांमधल्या गाण्यांना आपला आवाज दिला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.