आसामी गायक झुबीन गर्ग याचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलीस दलानं सिंगापूरच्या भारतीय उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, आसाम पोलिसांच्या गुन्हे तपास विभागानं झुबीन गर्ग यांचे सहकारी शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत यांना आज अटक केली. सिंगापूर इथं झालेल्या ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानू महंत आणि झुबीन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.