ख्यातनाम आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर आज गुवाहाटी जवळ कामरूप जिल्ह्यातल्या कामरकुची या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि झुबीन यांचे हजारो चाहते उपस्थित होते.
जुबिन गर्ग यांचं गेल्या शुक्रवारी सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून निधन झालं होतं. ते ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते.
गायक, गीतकार, संगीतकार, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामासाठी ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जुबिन यांना अफाट लोकप्रियता लाभली.