October 3, 2025 9:11 PM

printer

सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू, चौघांचा शोध सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात आज आठ पर्यटक बुडाले. आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ही घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. पण उपचार करताना त्याचीही मृत्यू झाला. उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. यातले काहीजण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाल्याचं वृत्त आहे.