सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक इथे एका जाहीर कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने झाला. या विकास कामांसंबंधीची एक चित्रफितही यावेळी प्रदर्शित करण्यात आली. यासोबत त्यांनी पंचवटीतल्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ आणि अन्य कामांची पाहणीही केली. या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.