January 6, 2026 7:21 PM | Silver Prices

printer

मुंबई सराफा बाजारात चांदी महागली!

मुंबईच्या सराफा बाजारात चांदी आज ६ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे अडीच लाख रुपयांच्या पलीकडे गेली. इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशनच्या दरांनुसार चांदी दिवसअखेर करांसह २ लाख ५० हजार ४४४ रुपयांच्या पलीकडे बंद झाली. गेल्या आठवड्यात चांदीनं अडीच लाखांच्या पातळीला स्पर्श केला होता, पण नंतर त्यात घसरण झाली होती. सोनं आज तोळ्यामागे सुमारे पाचशे रुपयांनी महागलं. २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ३७ हजार रुपये तर २४ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ४० हजार रुपये मोजावे लागत होते. रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाल्यानं आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. त्यामुळं सेन्सेक्स ३७६ अंकांनी घसरुन ८५ हजार ६३ तर निफ्टी ७२ अंकांनी घसरुन २६ हजार १७९ अंकांवर बंद झाला.