January 19, 2026 8:11 PM | Silver Price

printer

चांदीच्या भावानं ओलांडला ३ लाख रुपयांचा टप्पा

मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमतीनं आज किलोमागे ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या ५ आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे १ लाख रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज मुंबईच्या बाजारपेठेत चांदी किलोमागे १२ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी सुमारे ३ लाख २ हजार ८०० रुपये मोजावे लागले. 

सोनंही तोळ्यामागे सव्वा २ हजार रुपयांनी महाग झालं. त्यामुळं २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ४८ हजार रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ४४ हजार रुपये तोळ्यापेक्षा जास्त झाले आहेत.

जागतिक पातळीवर वाढत असलेला तणाव, अतिरीक्त आयात शुल्काची भीती यासारख्या कारणांमुळे देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज दिवसअखेर ३२४ अंकांनी घसरला आणि ८३ हजार २४६अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १०९ अंकांची घसरण नोंदवत २५ हजार ५८६ अंकांवर बंद झाला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.