डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे भूस्खलन

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुनशिथांग इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आज उत्तर सिक्कीमसाठी पर्यटनाचे कोणतेही परवाने जारी केले जाणार नसून पूर्वी जारी केलेले परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

 

गंगटोक ते चुंगथांग हा रस्ता सुरू असून लाचेन किंवा लाचुंग इथे प्रवास करणारे लोक गंगटोकपर्यंत परत येऊ शकतील. मुनशिथांग इथे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा