डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 2, 2025 1:36 PM | Sikkim

printer

सिक्किममध्ये भूस्खलनामुळे दीड हजार पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

सिक्कीमच्या लाचुंगमधून १ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. २९मेला झालेल्या ढगफुटी आणि धुवांधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, फूल व्हॅली आणि झिरो पॉइंटसारख्या ठिकाणांचं मोठ नुकसान झालं आहे. भूस्खलन आणि पूल कोसळण्यामुळे डिकचु-संकलांग-शिपग्येर, चुंगथांग-लाचेन-जीमा आणि चुंगथांग-लाचुङ रस्ते बंद आहेत. लाचेनच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.