डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिक्कीम भाजपने प्रधानमंत्री तसेच पर्यावरण मंत्र्यांना तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचे पुनर्मूल्यांकन करण्याची केली विनंती

सिक्कीममधल्या वादग्रस्त तिस्ता-III जलविद्युत प्रकल्पाच्या मंजुरीचं त्वरित पुनर्मूल्यांकन करावं अशी विनंती प्रदेश भाजपानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून केली आहे. सिक्कीम भाजपा प्रदेशाध्यक्ष डी. आर. थापा यांनी लिहिलेल्या या पत्रात, प्रकल्पाच्या मंजुरीमध्ये असलेला वैज्ञानिक पुनर्मूल्यांकनाचा अभाव, कालबाह्य सार्वजनिक सल्लामसलत आणि पर्यावरण विषयक संभाव्य जोखमींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी हवामान विषयक अद्ययावत डेटा, GLOF जोखीम आणि टेकड्यांमध्ये विकसित होणारी जलविज्ञान परिस्थिती लक्षात घेऊन नवीन पर्यावरण विषयक प्रभाव मूल्यांकन करावं, कारण यापूर्वी केलेल्या मूल्यांकनात या मुद्द्यांचा पुरेसा विचार केला नव्हता, असं यात म्हटलं आहे.