July 26, 2024 3:20 PM

printer

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार

शिखर बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी मुंबईतल्या विशेष सत्र न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व निषेध याचिका आणि दोन्ही अंतिम अहवालावर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयानं मान्य केली आहे. या अहवालांवर आक्षेप घेत काही दिवसांपूर्वीच ७ सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत.