डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 29, 2024 10:22 AM | India-Spain

printer

बडोद्यामध्ये भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

गुजरातमधील बडोदा इथं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीवेळी भारत आणि स्पेन यांच्यात रेल्वे वाहतूक, सीमाशुल्क, आणि गुंतवणुकीशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले. तसंच २०२६ हे वर्ष भारत-स्पेन यांच्यातलं सांस्कृतिक, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरं करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय विषयांवर व्यापक चर्चा केली. शाश्वत ऊर्जा आणि हवामान बदलांशी जुळवून घेण्यासंदर्भात उभय देशांचं सहकार्य बळकट करण्यावरही एकमत झालं असल्याचं या चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधला नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करारही लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्यास उत्सुक असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. त्यांनी दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली, तसंच या समस्येला तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या यादीतील अल कायदा, आयसिस, लष्करे तैयबा यासारख्या दहशतवादी गटाविरुद्ध समन्वयानं कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.