August 28, 2024 1:50 PM | Kharif crop

printer

खरीप पेरणीखालच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ

देशात खरीप पिकांचा पेरा यंदा वाढला आहे,  लागवडीखालचं एकूण क्षेत्र 1 हजार 65 लाख हेक्टरपेक्षा जास्त असून तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 44 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केला  त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार भाताचं पेरणी क्षेत्र 394 लाख 28 हजार हेक्टरवर पोहोचलं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे  क्षेत्र 378 लाख 4 हजार हेक्टर इतकं होतं. तर कडधान्याचं क्षेत्र गेल्या वर्षी 115 लाख 55 हजार हेक्टर होतं ते यंदा 122 लाख 16 हजार हेक्टर झालं आहे. भरडधान्य पिकांची  पेरणी यंदा  185 लाख  51 हजार हेक्टरवर झाली  आहे, जी गेल्यावर्षी 177 लाख  50 हजार हेक्टरवर झाली  होती. तसंच तेलबियांच्या उत्पादनातही वाढ झाली असून,188 लाख 37 हजार हेक्टरवर  तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.