2030 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा – गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक विक्री एक कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय वाहन उत्पादक संघाच्या 64 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशात जवळपास 30 लाख ईव्ही इलेक्ट्रिक नोंदणीकृत वाहनं असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भारतीय वाहन उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेत 6 पूर्णांक 8 टक्के योगदानासह सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं.