महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामराला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत कर्नाटकच्या जोनाथन अँथनीने सुवर्णपदक जिंकलं. भारत्तोलन स्पर्धेत पंजाबच्या मेहक शर्मानं महिलांच्या 87 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत तीन नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. पुरुषांच्या गटात, सेनादलाच्या लवप्रीत सिंगनं एकूण 367 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर उत्तराखंडच्या विवेक पांडेने कास्यपदक पटकावलं. स्क्वॅश स्पर्धेत, तामिळनाडूच्या वेलावन सेंथिलकुमार आणि गोव्याच्या आकांक्षा साळुंखे यांनी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या अंजली सेमवाल आणि राहुल बैथाचा यांना पराभवाचा सामना करावा लागला.