दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काल, लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीला, उद्योगवाढीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या समभाग साहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. या साहाय्यामुळे देशातल्या साडेपंचवीस लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांना फायदा होणार आहे. यामुळे येत्या दोन वर्षांत आर्थिक साहाय्य मिळणाऱ्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची संख्या एक कोटींहून अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तीस सप्टेंबर 2025 पर्यंत जाही करण्यात आलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, जवळपास सात कोटी उद्योगांनी आत्तापर्यंत तीस कोटींहून थोडे अधिक रोजगार निर्मिती केली आहे. या सरासरीचा विचार करता, येत्या दोन वर्षांत एक कोटींहून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.