प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
श्यामजी कृष्ण वर्मा भारतमातेचे वीर सुपुत्र होते, स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि राष्ट्रसेवा आपल्या कायम स्मरणात राहील, त्यांच्या शौर्याची आणि निर्भयतेची गाथा विकसित भारताच्या उभारणीसाठी एक मोठी प्रेरणा आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
तर भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा यांना अभिवादन, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.