ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज नागपूरमधे निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. २० हून जास्त कादंबऱ्या, १० कथासंग्रह, नाटकं, प्रवासवर्णन, ललित लेखन अशी विविधांगी लेखनसंपदा त्यांच्या नावावर आहे.
विशेषतः मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, कृतार्थ, भौमर्षि, स्वयंभू अशा थोर व्यक्तींच्या जीवनकार्यावर आधारित त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी ‘राजयोगी’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी भडभडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.