October 16, 2025 2:36 PM | shrilanka pm

printer

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमरसूर्या भारत दौऱ्यावर

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमरसूर्या आज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत पोहोचल्या. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याची परंपरा यापुढेही सुरू राहील आणि मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या निवेदनात लिहिलं आहे. या दौऱ्यात त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.