श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सोहळ्याचा प्रारंभ श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने झाला. नगर कीर्तन जात असलेल्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी तसंच फुलांची सजावट केली होती. देश-विदेशातून शेकडो भाविक या ऐतिहासिक समारंभात सहभागी झाले आहेत, सर्वांसाठी मोफत वाहनसेवा आणि भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. या समारंभात गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा वारसा जपला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. काल झालेल्या विशेष कीर्तन सोहळ्यात ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ‘शब्द गुरबानी’चे गायन करून अनोखी स्वरांजली अर्पण केली.
हिंगोली शहरात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून अनोखी मानवंदना दिली.
Site Admin | January 24, 2026 5:22 PM | Nanded | shree-guru-teg-bahadur-sahib
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन