६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मनू भाकर आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांना सुवर्णपदक

६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मनू भाकर आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांनी सुवर्णपदकं पटकावली. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात मनू भाकर हिनं ३६ गुणांसह सुवर्णपदक मिळवलं, तर कनिष्ठ गटात सिमरनप्रीत हिनं ३९ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरलं.