डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिलं आहे. या संदर्भातली सुनावणी येत्या २ डिसेंबरला होणार होती. मात्र, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी वेळेआधी घ्यावी, अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली होती. 

 

त्यामुळे आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्यापीठासमोर सुनावणी सुरु आहे.