डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 26, 2024 6:55 PM

printer

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘महाविजय संवाद’ दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा आज केली. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून उद्यापासून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. 

 

गेल्या दोन अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारनं केलेली कामं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी या अभियानाअंतर्गत दररोज एक नेता आणि उपनेता एका विधानसभा मतदार संघाला भेट देईल. तिथल्या पाच ठिकाणी जाऊन गाठीभेटी, मेळावे घेतले जातील, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.