शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू, असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढं ढकलली. न्यायालयात आज, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्यानं अर्ज करणं बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ.