शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्याला आकार देणाऱ्या बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं, विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे व्यक्त करत असत, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

 

ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी  आज दक्षिण मुंबईतल्या  ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे आजी माजी  नेते आणि कार्यकर्ते उपस्थित  होते.