कृषी उत्पादनाच्या सरसरीत वाढ करून शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी बियाणे उत्पादन क्षेत्रात बियाणे उत्पादक कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बीज परिषद २०२५ चं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
देशभरतल्या बियाण्यांच्या उपलब्धतेची माहिती, बीज प्रमाणीकरण आणि पुरवठा साखळी मजबूत व्हावी यासाठी या कंपन्यांनी ‘साथी’ या पोर्टलवर नावनोंदणी करावी, अशी सूचना त्यांनी दिली. हवामान बदलाचा वाढता परिणाम लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या हवामानात उत्पादन करण्यायोग्य बियाणांचे वाण विकसित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
भरड धान्य उत्पादन वाढलं तर भारताची अन्न सुरक्षा मजबूत होईल, असं कृषी मंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.