केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्याच्या दौऱ्यावर

बनावट बियाणे आणि कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदे आणणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. शिवराजसिंह चौहान कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत; काल त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात बाभळेश्वर इथं शेतकरी मेळाव्यात मार्गदशन केलं. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत केंद्राने 367 कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहितीही चौहान यांनी दिली. शिवराज सिंह चौहान यांनी काल रात्री शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. उद्या नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात होणाऱ्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.