डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया-कृषी मंत्री

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चात्य देशांच्या उदयापूर्वीच भारतानं  विविध पिकांचं बीज विकसित केलं होतं असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वनस्पती प्रजाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते. वनस्पतींच्या विविध प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी कायदा करणारा भारत हा जगातला पहिला देश असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बियाण्यांचं जतन करण्यासाठी आवश्यक संरचना उभारता यावी, यासाठी सरकारने बियाणे  संवर्धनासाठी १५ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.