डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच, अरविंद सावंत यांची स्पष्टोक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, कोणीही पक्ष सोडणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्यातलं अपयश चर्चेत येऊ नये म्हणून जाणून बुजून अशा अफवांची राळ उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सावंत यांच्यासह संजय देशमुख, नागेश आष्टीकर पाटील, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, भाऊसाहेब वाक्चौरे आणि पवन राजे निंबाळकर हे खासदार यावेळी उपस्थित होते. संजय राऊत, संजय दिना पाटील आणि प्रियंका चतुर्वेदी हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते आपल्या संपर्कात असून टप्प्याटप्प्यानं ते शिवसेनेत येतील असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वरचढ असल्याचं जाणवल्यामुळे अनेक जण शिंदे यांच्याबरोबर यायला इच्छुक आहेत, असं ते म्हणाले.