पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये शीतलदेवी आणि राकेशकुमार यांचा मिश्र तिरंदाजी प्रकारात नवा विक्रम.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार या भारतीय खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेत 1399 च्या एकत्रित गुणांसह एक नवीन विक्रम केला आहे. आता हे दोन्ही खेळाडू 2 सप्टेंबरला अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आज विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता आणि अंतिम फेरीत सहभागी होईल. तर सुहास यथीराज त्याचा बॅडमिंटनमधील दुसरा सामना खेळणार आहे. याशिवाय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये आज तीन भारतीय खेळाडू सहभागी होतील.